Lek Ladki Yojna :मुलींचा जन्मदर वाढवा आणि मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहित करण्यासाठी शासनाने १ ऑगस्ट २०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधारित) नवीन योजना १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन निर्णया नुसार लागू करण्यात आली आहे. सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन, सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणा करिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुषांगाने सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही नवीन योजना सुरु करण्यात आली.
यामध्ये मुलीच्या जन्मानंतर काही टप्यामध्ये अनुदान देण्यात येईल आणि लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीच्या खात्याला 75 हजार रुपये जमा करण्यात येतील.
यात बदल म्हणून माझी कन्या भाग्यश्री ही योजना अधिग्रहित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानांतर त्यांच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यासाठी शासनाने मंजुरी दिलेली आहे.
Lek Ladki Yojna Mahiti
सदर योजनेची उद्दिष्ट :-
- मुलींच्या जन्मास प्रोत्साहन देवून मुलींचा जन्मदर वाढवणे.
- मुलींच्या शिक्षणास चालना देणे.
- मुलींचा मृत्युदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे.
- कुपोषण कमी करणे.
- आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण कमी करणे.
लेक लाडकी योजनेचा लाभ कसा होणार:-
सदर योजने अंतर्गत खालील काही अटी आहेत.
यात प्रामुख्याने पिवळ्या आणि केशरी राशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना याचा लाभ घेता येईल. या कुटुांबात मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रुपये,
मुलगी जेव्हा इयत्ता १ ली मध्ये गेल्यावर ६ हजार रुपये.
इयत्ता सहावी मध्ये गेल्यावर ७ हजार रुपये.
अकरावी मध्ये गेल्यानंतर ११ हजार रुपये.
लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर खात्याला ७५ हजार रुपये.
याप्रमाणे लाभार्थी मुलीला एकूण रुपये 1,01,000/- एवढी रक्कम देण्यात येईल.
Lek Ladki Yojna :अटी व शर्ती :-
१ ) ही योजना प्रामुख्याने पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबासाठी लागू राहील.
२) दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू राहील
३) पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी आई – वडील यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
४) तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी आपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.मात्र त्यानंतर आई-वडील यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
५) दिनांक १ एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना ही योजना पात्र राहील.परंतु त्यानंतर आई-वडील यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे अनिवार्य राहील.
६) लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
७) लाभार्थी कुटुंबाचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात अवस्था असणे आवश्यक आहे.
८) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.
आवश्यक कागदपत्रे :-
1) लाभार्थीचा जन्माचा दाखला.
2) कुटुंब प्रमुख यांचा उत्पन्नाचा दाखला. (यामध्ये वार्षिक उत्पन्न हे १ लाखापेक्षा जास्त नसावे) याबाबत तहसीलदार किवा इतर सक्षम अधिकारी याांचा दाखला आवश्यक राहील.
3) लाभाथीचे आधार कार्ड (प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील)
4) पालकाचे आधार कार्ड.
5) बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत.
6) रेशनकार्ड (पिवळे किवा केशरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत )
7) मतदान कार्ड ( शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असण्याचा दाखला)
8) संबधित टप्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबधित शाळेचा दाखला (Bonafied)
9) कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शर्तीमधील क्रमांक 2 येथील अटीनुसार)
10) अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील (अविवाहित असल्याचे लाभार्थीचे स्वयंघोषणापत्र).
सदर योजनेसाठी अजून अधुकृत वेबसाईट उपलब्ध नाही.